न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एकावर कोयत्याने वार केले. ही घटना वाल्हेकरवाडी येथे गुरुवारी (दि. ४) रात्री घडली. संदीप ऊर्फ बाबु रामभाऊ वाल्हेकर (वय ३६, रा. शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी) यांनी शुक्रवारी (दि. ५) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वायदंडे आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वाल्हेकर यांच्या गोठ्यात घसून कोयत्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या ओळखीच्या बाळू शिंदे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या वडिलांच्या अंगावर धावून गेले.














