न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड शहरातील क्विन्स टाऊन सोसायटीत राहणा-या माही अवध जैन (वय १२ ) या मुलीचे दोन आरोपींनी अपहरण करून खंडणीची मागणी केली होती. शहर पोलिसांनी तत्पर हालचाली करीत काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या घटनेचे पडसाद शहरभर पसरले असून, पोलिसांनी तत्परता दाखवून अपह्रत मुलीची चपळाईने सोडवणूक केली. या स्तुत्य कामगिरीची दखल घेत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार (दि. १६) रोजी पोलिस आयुक्त पद्मनाभन व संपूर्ण पोलीस टीमचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक राजू मिसाळ, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष दिलीप गोते, बिपीन नाणेकर व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
















