- आखिल भारतीय मराठा महासंघाचे शिष्टमंडळ नगरविकास मंत्र्यांना भेटणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- नेहरुनगरमधील आखिल भारतीय मराठा महासंघ व युपी मधील एका मुस्लिम गॅरेजवाल्या बरोबर अनेक वर्षापासूनचा वाद आहे. या मुस्लिम व्यक्तिने मराठा महासंघाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. असा आरोप महासंघाकडून वारंवार केला जात आहे. पण हा वाद असताना देखील त्या व्यक्तिने या जागेवर दुमजली अनाधिकृत बांधकाम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन केले असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे हा वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळला जाणार असून या वादाने भयानक स्वरुप धारण केल्यास याला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनधिकृत विभागाचे अधिकारी असतील असा इशारा आखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर सरचिटणीस प्रा. दत्तात्रय यादव-सोळसकर यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आखिल भारतीय मराठा महासंघाचे ४० वर्षापासुन मध्यवर्ती कार्यालय आहे. हे सर्वांनाच माहित आहे. पण या कार्यालयच्या आज बाजुला थोडी फार जागा सोडण्यात आली होती. तर या जागेवर काही स्थानिक लोकांच्या सहकार्याने दोन्ही बाजुला अतिक्रमण केले गेले. त्यातच या गॅरेजवाल्याचा देखील समावेश आहे. काही महिण्यापुर्वी या गॅरेजवाल्याने या जागेमध्ये अंधराचा फायदा घेत पक्के बांधकाम करण्यास सुरवात केली होती. पण मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर पध्दतीने पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाला या बेकादेशीर बाबीकडे लक्ष वेधून बांधकाम थांबवले होते. पण आता काही दिवसापुर्वी पुन्हा रात्रीच्या वेळीच हे बांधकाम पुर्ण केले जात असून हे बांधकाम रहदारी रस्त्यावर अतिक्रमण करुन चक्क दुमजली केले जात आहे.
मनपा अधिकाऱ्यांची कार्यपध्दती संशयाच्या भोवऱ्यातः मराठा महासंघ जाणार कोर्टात…
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम हे सबंधित व्यक्तिने महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधलेले बांधकाम हे अनधिकृत समजले जाते. या बाबत मा. उच्च न्यायालयाने महापालिकेला अनेकदा खडे बोल सुनावले आहे. तसेच अशा अनाधिकृत बांधकामे करण्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नेमके याच आदेशाचा भंग हे महानगरापालिकेताल काही अधिकारी करत आहेत. परदेशी यांच्या काळात शहरात अशी अनाधिकृत बांधकामे होऊ नये म्हणून बीट निरीक्षकांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. पण या बीट निरीक्षकांची कार्यपध्दती देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून या सर्वा विरोधातच मराठा महासंघ न्यायालयात धाव घेणार असल्याचे मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. यामुळे जर अशी अनाधिकृत व धोकादायक दुमजली बांधकामे होत असतील तर याला जबाबदार व्यक्तिंना देखील कायद्याचा हिसका दाखवणे क्रमप्रॉप्त असल्याचे महासंघाकडून सांगण्यात येत आहे.
तक्रार करुनही दखल न घेतल्याचे कारण काय…?
हे बांधकाम अनाधिकृत आहे. या बाबत महापालिकेच्या सारथी वेबसाईटवर व सबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज व फोनवर बोलून देखील कल्पना दिली आहे. तरी देखील यातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी या अवैध बांधकामाला साधी नोटीस देखील दिली नाही. तर सदर बांधकाम करणारा व्यक्ति अधिकारी माझ्या मुठीत असून त्यांना त्यांच्या हिस्सा मिळाला असल्याचेही सांगत सुटत आहे. त्यामुळे हे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत हे तरी महानगरपालिकेच्या सबंधित अधिकाऱ्यांनी सांगावे असा प्रश्न मराठा महासंघाकडून केला जात आहे.