न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्सव बिजलीनगर येथे संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळा उत्सवानिमित्त शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी शासनाच्या नियमानुसार फिजिकल डिस्टन्सिंग ठेऊन उत्सव पार पाडण्यात आला.
परिसरातील गरजू लोकांना आणि मजूरांना अन्नवाटप करण्यात आले. यावेळी करण पवार, किशोर फुकटे, शुभम कडू पाटील, प्रशांत बिराजदार आणि यश भारंबे आदी उपस्थित होते.