न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन अनलाॅक करण्यात आल्यानंतर आता इयत्ता दहावीचे पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक एक जून पासून शाळेने सुरू केले आहे.
संसर्गामुळे जास्तीत जास्त काळ घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करता यावा या दृष्टीने शाळेतील शिक्षक सचिन कळसाईत, वैशाली काळे, उत्कर्षा पाटील आणि रिता राजभोर यांनी वेळापत्रक बनवले आहे.
इंटरनेटसह नवमाध्यमांचा वापर करण्यावर शाळेने भर दिला आहे. किंबहुना ‘”लर्न फ्रॅाम होम”ही नवी शैक्षणिक पध्दती सर्वानीच स्विकारणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त शिक्षण पोहोचविण्याचा शाळेचा व शिक्षकांचा प्रयत्न आहे, असे संस्थेचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांनी न्यूज पीसीएमसी च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.