न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८. जून. २०२०) :- पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात येणाऱ्यांचे आकर्षण स्थळ असणारे भुशी धरण यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी तसे आदेश दिले आहेत.
भुशी धरण व लोणावळा परिसरातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाटाचा परिसर, खडकवासला धरण, भीमाशंकर, माळशेज घाट, भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पानशेत धरण व परिसर यावर्षी बंद ठेवण्यात येणार आहेत.
यावर्षी देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुशी धरण व लोणावळा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.


















