न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८. जून. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्याकडील ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालय काढून घेऊन ती जबाबदारी इंदलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे असलेल्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दुरगुडे यांच्याकडे आता सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे. तर, इंदलकर यांच्याकडे कायदा विभाग, कामगार कल्याण व ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालय आहे. तर, अलमलेकर यांच्याकडे झोपडपट्टी निर्मूलन व स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) विभागाची जबाबदारी दिली आहे.


















