न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८. जून. २०२०) :- कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कृष्णानगर-पूर्णानगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या पुढाकाराने रविवारी (दि. ७) रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ८८ जणांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
पूर्णानगर येथील शनी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या शिबिरात पूर्णानगर, शिवतेजनगर व कृष्णानगर भागातील सामाजिक कार्यकर्ते, महिला आदींनी सहभाग घेतला. शिबिरास महापौर उषा ढोरे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते रक्तदातांना प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
या वेळी माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपचे निगडी-चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके, मोतीराम पवार, गोरख पाटील, संतोष ठाकूर, अनिल माने, सुभाष आहेर, अजय पाताडे, शिवाजी कणसे, श्रीकांत कदम, पोपट हजारे, रवी खैरनार, संजय कोरडे, अनिकेत बाबर, संतोष ठाकुर आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी शिबिरात होमिओपॅथी गोळ्याचे मोफत वितरण करण्यात आले.














