- दळवीनगर, काळेवाडी, भोसरी, खराळवाडी, पिंपरी, वाकड, रहाटणी, वडमुखवाडी परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी हाती आलेल्या अहवालानुसार २० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात १४ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. आज शहराबाहेरील भारती विद्यापीठ, बालेवाडी येथील एका ६० वर्षे वयाच्या पुरुषाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७८८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात २८७ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण आनंदनगर, दापोडी, भारतनगर पिंपरी, मोरवाडी, दत्तनगर थेरगांव, पाटीलनगर चिखली, भाटनगर, वडमुखवाडी, भोसरी येथील रहिवाशी आहेत.
आज आनंदनगर, बौध्दनगर, दत्तनगर आकुर्डी, सांगवी, किवळे, पिंपळे गुरव, रहाटणी, भोसरी, पिंपळे सौदागर, विजयनगर दिघी, भाटनगर, बालघरेवस्ती चिखली, दापोडी, काळेवाडी फाटा, सदगुरू कॉलनी वाकड, मोरेवस्ती, पिंपरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, चिंचवड स्टेशन, आंबेगांव व मावळ येथील ३४ रुग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४७२ वर पोहोचली आहे.
आज रेणुका अपार्टमेंट – दळवीनगर, विजयनगर – काळेवाडी, बालाजीनगर – भोसरी, साई श्रध्दा अपार्टमेंट – खराळवाडी, सोनकर कॉम्पलेक्स – पिंपरी, कमलाकर चौक – वाकड, शिवतीर्थनगर – रहाटणी, वडमुखवाडी – भोसरी परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.














