न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जून. २०२०) :- पिंपळे सौदागर येथील पुलावर चार ते पाच जणांनी एका युवकावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, उपचार सुरू असताना सोमवारी (दि. ८) रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. विराज विलास जगताप (वय २० रा. तक्षशिला नगर, पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी युवकाच्या नातेवाईकांनी काही संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचे सांगवी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.














