न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२०) :- थरमॅक्स चौक येथे पिकअप व्हॅनला दोरखंड बांधून चोरट्यांनी आयसीआयसीआय बँकचे एटीएमच चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. १) रोजी पहाटे घडली.
पहाटे चार ते पाच जण याठिकाणी पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधून एटीएम ओढून नेले. सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला. त्याने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बँकेने या एटीएममध्ये सात तारखेला दहा लाखांची रोकड टाकली होती. त्यापैकी एमटीएममध्ये किती रक्कम होती, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.














