न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरात सोमवारच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी ४८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते चार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
लक्ष्मण ठोकळ, संदीप वर्मा (दोघेही रा.पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड), विकास जाधव, रमेश कांबळे आणि तेजस मलेश गोपरेडी (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
‘आम्हाला मोकळं सोडा’ मागणीसाठी हा जमाव रस्त्यावर उतरला होता. यावेळी जमावाच्या मागणीला हिंसक वळण लागले. काहींनी पोलिसांच्या बुथमधील खुर्त्यांची तोडफोड केली. रस्त्यावर पडलेले दगडं उचलून पोलिसांच्या दिशेने भिरकावली. काही हुल्लडबाजांनी पोलिसांच्या खासगी वाहनांची तोडफोड करीत ती गटारात टाकली. त्यानंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत जमावावर लाठीचार्ज केला.
पोलिसांनी या प्रकरणी देवनूल, विशाल मोरे, करण बोरुले, धन्या खंडागळे, बाळ्या, मुसा, बाब्या, विशाल भोसले, मल्हारी कांबळे, धीरज म्हस्के, महादेव सरोदे, विमल गायकवाड, शीला कांबळे, कलावती सोनटक्के, रेश्मा कांबळे, रोहन आसोदे, राहूल चलवादी, रोहित गोंदणे व इतर २५ महिला व पुरुष यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक रोहिणी शेवाळे यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


















