न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- पतीच्या मित्राने सोशल मीडियावरून महिलेला अश्लिल फोटो व मेसेज पाठवून विनयभंग केला. आरोपीने अश्लिल फोटो पाठविलेला मेसेज रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास महिलेला तिच्या व्हॉटस अॅपवर आलेला दिसला. त्यामुळे फिर्यादी घाबरल्या. त्यांनी ते फोटो व मेसेज डिलीट केला. तसेच सदरचा फोन नंबर त्यांनी ब्लॉक केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. ८) फिर्यादी यांना त्यांच्या फोनमधील व्हाटस अॅपवर एका फोन नंबरवरून अश्लिल फोटो व मेसेज आल्याचे दिसले. त्यांनी याबाबत त्यांच्या पतीला सांगितले. सदरचा व्हॉटस अॅप नंबर हा आरोपी याचा असल्याची खात्री केली. आरोपी याने फिर्यादींच्या भाचीला देखील फोनवर मेसेज करून त्रास दिला होता. त्याबाबत त्याला सूचना देखील देण्यात आली होती.
चिंचवड येथे सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी चिंचवड येथील ४७ वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.















