न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या मोशी येथील क्वारंटाईन सेंटरमधील कोरोना संशयित नागरिकांचे अहवाल उशिरा येत असून जेवण आणि इतर सुविधा मिळत नसल्यामुळे या नागरिकांनी आज मंगळवारी सकाळी क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, गेटला कुलूप असल्याने ते बाहेर पडू शकते नाहीत. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी समोर आणला आहे. या सेंटरमध्ये एकूण २१० नागरिक क्वारंटाइन करण्यात आलेले आहेत.
महापालिकेने मात्र, नागरिकांचे आरोप फेटाळले असून “नाष्टा, जेवण, चहा वेळेवर दिला जात आहे. अहवाल येण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आहे. गेट लावण्याच्या मीच सूचना दिल्या होत्या, आतमध्ये अनेक जण जातात.” असे महानगर पालिका प्रशासनाचे प्रशांत जोशी यांनी सांगितले आहे.