न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात एक ट्रक व एक दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. वाहन चोरीचा पहिला प्रकार १८ ते २५ मे दरम्यान भोसरी एमआयडीसीत सेक्टर १० येथे घडला.
अनिकेत बाळू सोमवंशी (वय २१, रा. मोशी) यांनी मंगळवारी (दि. ९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी सोमवंशी यांनी त्यांचा चार लाख रुपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीसमोर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेला.
वाहन चोरीचा दुसरा प्रकार भोसरी येथे पीएमटी चौकात ४ जून सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. राहूल काशिनाथ दासरे (वय ४०, रा. गुरुनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) यांनी मंगळवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दासरे यांनी ४ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास त्यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी पीएमटी चौक, येथील शिवाजी पुतळ्याच्या समोर उभी केली होती. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.


















