न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- माहे जून महिन्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत असून बऱ्याच शाळा या शासकीय आदेश आल्यानंतरच चालू होतील. महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत येणा-या सर्व खाजगी शाळांमध्ये आज ऑनलइन शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला असून सर्वच खाजगी शाळांमध्ये अशा प्रकारचे शिक्षण चालू करण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक शाळामध्ये हजारो विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असून ते या शाळामध्ये शिकत आहेत. त्यांच्याही पुढील भवितव्याचा विचार करून महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अशा प्रकारचे ऑनलाइन शिक्षण घर बसल्या देता यईल का? याविषयी विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. येणा-या काळामध्ये शाळा आणखी किती दिवसांनी चालू होतील याबद्दल अजूनही आपण सांगू शकत नाही.
त्या दरम्यान या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना कुठल्या ना कुठल्या पकारे घरबसल्या शिक्षण देणे ही आपल्या शाळेचीसुध्दा तेवढीच जबाबदारी आहे. महापालिकेने याविषयीचे धोरण तयार करून लवकरात लवकर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यासाठी ऑनलइन शिक्षणाची व्यवस्था करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.