न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी २२०० रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, असा आदेश काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी किंमत निश्चित करुन दिल्यामुळे आता खासगी लॅब्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,” असं टोपे यांनी सांगितलं.