- दापोडीतील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी हाती आलेल्या अहवालानुसार ३८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात २१ पुरुष व १७ महिलांचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील सिंहगड रोड आणि खडकी येथील तीन पुरुष आणि दोन महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. आज शहरामधील दापोडीतील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११४८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४९४ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज बाधित झालेले रुग्ण नाणेकर चाळ पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, रमाबाईनगर पिपरी, दापोडी, आनंदनगर, गवळीनगर भोसरी, नेहरुनगर, अजंठानगर, जुनी सांगवी, गुलाबनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, बिजलीनगर, वैभवनगर पिंपरी, तापकीरनगर काळेवाडी, नढेनगर काळेवाडी, नवी सांगवीतील रहिवाशी आहेत.
आज आनंदनगर, मोरेवस्ती, रामनगर चिंचवड, ताथवडे, नाणेकर चाळ पिंपरी, महात्मा फुलेनगर वायसीएम, आनंदनगर जुनी सांगवी, लिंक रोड पिपरी, गुलाबनगर दापोडी, जनतानगर चिंचवड, बौध्दनगर पिपरी, दत्तनगर वाकड, अजंठानगर, मोरवाडी, पाटिलनगर चिखली, ढोरेनगर सांगवी, निगडी, पिंपळे गुरव, सदगुरु कॉलनी वाकड, लिबोरे वस्ती दापोडी, चिंचवड स्टेशन, शिंदेनगर जुनी सांगवी, इंदिरानगर चिचवड, रुपीनगर, खेड, जुन्नर, बोपोडी येथील २८ कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.