न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ करोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून शनिवारी (दि. १३) पहाटे दोन आरोपी पळाले होते. त्यातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शनिवारी (दि. १३) पुन्हा बेड्या ठोकल्या.
अरशद हनिफ सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सय्यद याच्या विरोधात खडकी, येखडा पोलीस ठाण्यात जबरी चोरी तर वाकड आणि भोसरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.