न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी पुणे – नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा येथे शनिवारी (दि. १३) दुपारी केली. हृषीकेश बाळासाहेब गायकवाड (वय २२, रा. भोसरी, मूळ रा. कुरुळीगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमरास एक तरुण पुणे – नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा येथे येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याची झडती पेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा मिळून आला.