न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचा वॉर्डबॉय जगदीश मुरलीधर काटे याचा खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याकारणाने त्याचे महापालिका आयुक्तांनी निलंबन केले आहे. तसे आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (दि. १३) रोजी काढले आहेत.
काटे हा क्रीडा विभागाअंतर्गत नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडिमय येथे काम करीत होता. त्याच्या विरोधात खुनाचा तसेच, अनुसूचित जाती जमाती कायदा २०१५ चा गुन्हा सांगवी पोलिस ठाण्यात दाखल होऊन त्याला ९ जूनला अटक झाली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने आयुक्तांनी काटे याचेवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.