न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे नाव माधव पाटणकर असे आहे. त्यांनी मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते सासरे होत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला असून पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.


















