न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदवीधारक आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी सोमवारी वेतनवाढीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
महानगरपालिकेच्या रुग्णलयात पदवीधारक आणि पदव्युत्तर असे ४० ते ४५ डॉक्टर काम करीत आहेत. या डॉक्टरांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही पिंपरी-चिंचवड महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप वैद्यकीय अधिकारी यशवंत इंगळे यांनी केला आहे. करोनाच्या संकटात कर्तव्य बजावत असून कामावर परिणाम होऊ न देता काळ्या फिती लावून आम्ही काम करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.