न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रभाग क्रमांक २ जाधववाडीमध्ये योग्य ते निर्बंध लादण्याची मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. जाधववाडी परिसरामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता; परंतु मागील दोन दिवसांमध्ये एकदम तीन रुग्ण आढळून आले आहेत. जाधववाडी आणि परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ जाधववाडी परिसर पूर्णपणे परत एकदा पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन करावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.