न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विविध प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफ सफाई करणे व चोकअप काढणेचे काम सुरू आहे. त्यासाठी १ वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मंजूरी देणेत आली. १ वर्षाकरीता येणा-या र.रू. ७ कोटी ४० लाख खर्चासह एकूण १० कोटी ३३ लाख रकमेच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक कापडी मास्क खरेदी करणेकामी येणार्या १ कोटी ५० लाख रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सांगवी-किवळे या बी.आर.टी.एस. रस्त्यावरील काळेवाडी फाटा ते डांगे चौक दरम्यान कावेरीनगर येथे नव्याने सब-वे बांधणेत आला आहे. सदर सब-वेच्या कामामुळे १३२ केव्हा टॉवर लाईनचे जमिनी पासुनचे (vertical Clearance)
नियमापेक्षा कमी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. सबब सदर कामाचे वीज पर्यवेक्षण शुल्क रक्कम रू. ३२ लाख ६० हजार रकमेच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
संसर्गजन्य रोग नियंत्रणात आणणेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असलेने म.न.पा.चे वाय.सी.एम. रूग्णालयास आवश्यक लागणारे PPE Kit withN95 Mask खरेदी करणेकामी येणा-या एकूण र.रू. ८२ लाख ७६ हजार रकमेच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.


















