न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही याची काळजी घेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या.
पावसाळापूर्व नालासफाई व इतर करावयाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या एक्साईड इंडस्ट्रीज एमआयडीसी चिंचवड, मिल्कमेड बेकरीजवळ एमआयडीसी चिंचवड, बालाजी पेट्रोल पंपाजवळ वाहतूकनगर निगडी, एस.के.एफ कंपनी जवळ चिंचवड येथील नाल्यांची पाहणी केली. तसेच प्राधिकरण सेक्टर नं. २६ येथील गणेश तलावाची देखील पाहणी केली. ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या लक्ष्मीनगर माणिक कॉलनी, प्रेमलोक पार्क एस.के.एफ. कंपनी जवळ व आकुर्डी रेल्वे स्टेशन रोड येथील नाल्यांची पाहणी केली.
तसेच फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या महाराणा प्रतापसिंह पुतळा, माता अमृतामय विद्यालय, शनिमंदिर सी.डी.सी.वर्क, घरकुल आतील चौक वॉटर लॉगिग ठिकाण येथील नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी संबंधित अधिका-यांना याबाबतच्या सूचना केल्या. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्य संजय नेवाळे, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, विठ्ठल भोईर, एकनाथ पवार, अमित गावडे, सचिन चिंचवडे, सुरेश भोईर, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, वैशाली काळभोर, अपर्णा डोके, शैलजा मोरे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, रेखा गाडेकर आदी उपस्थित होते.


















