न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19. जून. 2020) पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 19) रोजी 95 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच आज मृत झालेला रुग्ण काळेवाडीतील नढेनगर येथील 48 वर्षीय पुरूष रूग्ण आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 1569 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 579 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 09 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण इंदिरानगर चिंचवड , खराळवाडी , साईचौक बोपखेल , समर्थनगर सांगवी , अष्टविनायक काॅलनी काळेवाडी , रिव्हर रोड पिंपरी , गांधीनगर पिपरी , विठ्ठल नगर पिंपरी , संत तुकाराम नगर पिपरी , बौध्दनगर , भाटनगर पिंपरी , पिंपरी , शिवतिर्थनगर काळेवाडी , सोनगीर विहार काळेवाडी , साईबाबा नगर चिंचवड , मोहननगर चिंचवड , मिलिंदनगर पिंपरी , सिध्दार्थनगर दापोडी , अजंठानगर , नाणेकर चाळ पिपरी , तापकीर नगर काळेवाडी, जगताप डेअरी , पिंपळे सौदागर , मोरेवस्ती चिखली , निगडी , क्रांतिनगर आकुर्डी , मोरवाडी , वैदूवस्ती पिंपळे गुरव , खंडोबामाळ , तानाजीनगर चिंचवड , विद्यानगर चिंचवड , नवी सांगवी , पंचतारानगर आकुर्डी , घरकुल चिखली , दत्तनगर चिंचवड , जयभवानी कॉलनी थेरगांव , यमुनानगर , दापोडी , शिवशत्ती चौक भोसरी , वैभवनगर पिपरी , नाशिक फाटा काळेवाटी , बिजलीनगर चिंचवड , उद्यमनगर चिंचवड येथील रहिवासी आहेत.
आज साईबाबा नगर चिंचवड , शिंदेनगर जुनी सांगवी , दिघी , बेलठीका नगर थेरगाव , काळभोरनगर , भारतमातानगर पिंपरी , ममतानगर जुनी सांगवी , दत्तनगर पिपरी , रमाबाईनगर पिंपरी , सिध्दार्थनगर दापोडी , आनंदनगर चिंचवड , जाधवनगर चिखली , बौध्दविहार पिंपरी , शाहुनगर चिंचवड , सद्गुरु काॅलनी वाकड , पत्राशेड पिंपरी येथील रहिवासी असलेले कोविड -१ ९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.















