न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19. जून 2020):- कोरोनाच्या अनुषंगाने आनंदनगरमधील नागरिकांना स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे,शितल शिंदे, जयश्री गावडे, कोमल मेवाणी व साधू वासवानी मिशन अंतर्गत ३००० अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
यात 5-किलो तांदूळ, 5-किलो गहू आटा, 3-किलो तिन प्रकारच्या दाळ, 1-किलो चहा पत्ती,1-किलो साखर, 1-किलो पोहे, 1-किलो तेल, 1-किलो मिरची पावडर व मसाला या गोष्टींचा समावेश आहे.
नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, ‘आनंदनगर येथे गेल्या एक महिन्यापासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.तेव्हापासून दोन वेळा रोज 7000 लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच यापुढेही त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. नागरिकांनी घरी थांबून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहन नगरसेवक मोरे यांनी केले आहे.















