न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20 जून 2020) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरीकांना मिळकतकराची रक्कम थकबाकीसह ( अवैध बांधकाम शास्तीकराची वगळून ) एकरकमी १०० टक्के रक्कम ३० जून २०२० पर्यंत भरल्यास मिळकतकर धारकांना मनपा कराच्या विलंब दंड रकमेत ९ ० टक्के सवलत देण्यात येणार आहे . नागरीकांनी याचा लाभ घेणेबाबत स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आवाहन केले आहे .
ज्या नागरीकांच्या वैध बांधकामावरील मिळकतकराची मागील थकबाकी आहे त्यांनी दि . ३०/०६/२०२० अखेर मिळकतकराची १०० टक्के थकबाकी भरून थकबाकीवरील विलंब दंडाच्या रकमेत ९ ० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच ज्या नागरीकांनी अनधिकृत बांधकामावरील मिळकतकर व शास्तीकराचा भरणा केला नाही . अशा नागरीकांनी ही शास्तीकर वगळून मूळ मिळकतकराची थकबाकी एकरकमी ३० जूनपर्यंत भरून विलंब दंड रकमेत सवलतीचा लाभ घ्यावा.
चालू सरकारी वर्षाचे मिळकतकराच्या मागणीत माजी सैनिक , स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी , महिलांच्या नावे तसेच ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले दिव्यांग मिळकतकर धारकांना सामान्यकरात ५० टक्के सूट मिळेल . तसेच संपूर्ण मिळकतकराची रक्कम आगाऊ भरणाऱ्या मिळकतकर धारकांना सामान्यकरात निवासी १० टक्के व बिगरनिवासी मिळकतधारकांना ५ टक्के सवलतीचा लाभ दि . ३० जूनअखेर भरणाऱ्यांना मिळेल वरील सवलत कोणत्याही एका योजनेसाठी मिळेल.
मिळकतकराची ( वैध / अवैध मिळकत ) एकरकमी थकबाकी व चालू वर्षाच्या मिळकतकराची आगाऊ रक्कम ३० जूनअखेर भरून महापालिकेने दिलेल्या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.














