- स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जून 2020):- कुदळवाडीमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या बरोबरच इतरही आरोग्य सेवेसाठी महापालिकेचे कोणतेही आरोग्य केंद्र जवळ नसल्यामुळे येथील सामान्य नागरीकांची व रुग्णांची मोठ्या प्रमाणात कुचूंबणा होत आहे. त्यामुळे कुदळवाडीतील रिकाम्या शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरते आरोग्य केंद्र उभे करण्यात यावे, अशी मागणी प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी राहुल काशीद, किशोर लोंढे उपस्थित होते.
कुदळवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी माहापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सेवेची आवश्यकता आहे. आज या परिसरातील रुग्णांना पालिकेच्या आरोग्यसेवेचा लाभ घ्यायचा असल्यास येथून लांब असलेल्या आकुर्डी येथील रुग्णालयात जावे लागते. पण करोनाच्या विषाणुमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, काही नागरीक आपले आजार अंगावर काढत आहेत. या भितीमुळेच खाजगी रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत असून, खाजगी रुग्णालयाकडून या चाकरमानी घटकांची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे.
त्यामुळे कुदळवाडी येथील रिकाम्या शाळेच्या इमारतीमध्ये तात्काळ तात्पुरत्या स्वरुपाचे आरोग्य केंद्र उभे करावे, अशी मागणी फ प्रभागाचे स्विकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी निवदेनाव्दारे मनपाच्या अतिरीक्त आयुक्तांकडे केली आहे.
जुन्या शाळेचे नव्या जागेत स्थलांतर…
कुदळवाडी येथील महानगरपालिकेची प्राथमिक शाळा ही काही कालावधीपुर्वी दुसऱ्या जागेत स्थलांतरित आली आहे. तसेच कुदळवाडी येथील करोनाचे वाढते रुग्ण पाहता या ठिकाणी आरोग्य केन्द्रं उभे करणे गरजेचे बनले आहे. तसेच येथील नागरीकांना देखील पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणाहुन लांब असलेल्या आकुर्डी येथील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही जण या रुग्णालयाचे अंतर खुप लांब असल्यामुळे खाजगी रुग्णालयात जातात. पण त्यांची भरमसाठी फी या सामान्या चाकरमानी रुग्णांना परवडत नाही. तसेच या ठिकाणची वाढती लोकसंख्या पाहता या मोकळ्या शाळेच्या इमारतीमध्ये तात्काळ आरोग्य केंद्र उभे राहणे गरजेचे आहे.
– दिनेश यादव, फ प्रभाग स्विकृत नगरसदस्य…















