न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20 जून 2020) :- बालाजीनगर येथील नाल्याचे कामाबाबत एमएसईबी , एमआयडीसी , एमएनजीएल सह संबंधित विभागाबरोबर बैठक आयोजित करण्यात यावी व जाधववाडी परीसरातील नाल्याबाबत मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा, अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी दौ-यात दिल्या .
पिंपरी चिंचवड शहरातील मान्सून पूर्व पूरनियंत्रण तयारीचा आढावा व कामाची पाहणी त्यांनी क , इ आणि ग प्रभागात केली. त्या वेळी या सूचना देण्यात आल्या. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता या दौ – याला प्रारंभ झाला.
त्या वेळी पक्षनेते नामदेव ढाके , नगरसदस्या सिमाताई सावळे , नगरसदस्य विक्रांत लांडे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , आशा दुर्गुडे , कार्यकारी अभियंता संजय घुबे , विजय काळे , नितीन देशमुख , सहाय्यक आरोग्याधिकारी बी.बी.कांबळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
प्रथमत: टेल्को रस्त्यावर बालाजीनगर येथे नाल्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी नाल्यामधून जाणाऱ्या विद्यूत लाईन , एमआयडीसी ची पाण्याची लाईन व एमएनजीएल च्या पाईपलाईनमुळे नाले सफाईचे कामामध्ये अडथळे निर्माण होत असल्याची बाब नगरसदस्या सिमा सावळे यांनी या वेळी महापौर माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे निदर्शनास आणून दिली . या वेळी त्यांनी याबाबत सर्व संबंधितांची बैठक लावून योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या .
त्यानंतर प्रभाग क्र . ८ मधील सेक्टर ११ येथील नाल्याची पाहणी करण्यात आली . या नाल्यातून एमएनजीएल च्या पाईपलाईन गेल्यामुळे नाले सफाई करीत असतांना अडचणी निर्माण होत असल्याचे नगरसदस्या सिमा सावळे यांनी सांगितले . त्यावर एमएनजीएल बरोबर बैठक लावून चर्चा करून निर्णय घेण्याची सूचना अधिका-यांना या वेळी देण्यात आली .
त्यानंतर प्रभाग क्र .२ मधील जाधववाडी येथील वाशींग सेंटर जवळचे नाल्याची पाहणी महापौर माई ढोरे , आयुक्त श्रावण हर्डीकर व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली . या वेळी शेतकऱ्यांचे शेतातून नाले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे . त्यावर मार्ग काढण्याची मागणी माजी महापौर व नगरसदस्य राहुल जाधव यांनी केली . त्यावर शेतकऱ्याचे नाल्याबाबत मास्टर प्लॅन तयार करून त्याचे नियोजन करावे अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी नगरसदस्या अश्विनी जाधव उपस्थित होत्या .
चिखली मोशी रस्त्यावर सिटी प्राईड शाळे नजीकच्या नाल्याचे कामाचीही पाहणी या वेळी करण्यात आली . इ क्षेत्रीय कार्यालयाचे परीसरातील श्री.नागेश्वर महाराज नगर लगतचा नाला मोशी , आदर्शनगर पूल ते सी.एम.इ.भिंत नाला दिघी , मयुरी मंगल कार्यालय एस.पी.जी. इंटरनॅशनल शेजारील नाला , आळंदी रस्ता भोसरी व आदिनाथ नगर नाला , गव्हाणेवस्ती भोसरी व भोसरी नवीन हॉस्पीटल जवळच्या नाल्याची पाहणीही यावेळी करण्यात आली .
यावेळी स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे , नगरसदस्या भिमाताई फुगे , सोनाली गव्हाणे व नगरसदस्य नितीन लांडगे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर , अण्णा बोदडे , कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी उपस्थित होते .
त्यानंतर ग क्षेत्रीय कार्यालयाचे परिसरातील केजू देवी , कुणाल रेसिडन्सी नाला , ग क्षेत्रीय कार्यालय , धनगरबाबा , संजय गांधीनगर ब्रिज जवळच्या नाल्यांची व परिसराची पाहणीही यावेळी करण्यात आली . यावेळी महापौर माई ढोरे , आयुक्त श्रावण हर्डीकर , पक्षनेते नामदेव ढाके अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे , नगरसदस्य अभिषेक बारणे , चंद्रकांत नखाते , बाबासाहेब त्रिभुवन , नगरसदस्या झामाबाई बारणे , अश्विनी जाधव , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे आदी उपस्थित होते .