न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.20. जून. 2020) :- खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी ज्यादा दर आकारणी न करता शासकीय दरानुसार आकारणी करण्यात यावी. तसेच रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देणेबाबतच्या सूचना महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी दिल्या.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अंमलबजावणीबाबत खासगी रुग्णालय प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन गुरूवारी (दि. 18) रोजी स्थायी समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पक्षनेते नामदेव ढाके , आयुक्त श्रावण हर्डीकर , ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम , नगरसदस्य सागर अंगोळकर , नगरसदस्या उषा मुंढे , माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ . वर्षा डांगे , आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ . राजशेखर अय्यर , डॉ . एस . पी . सिंग , डॉ.डी.वाय . पाटील हॉस्पिटलचे डॉ . एच.एच. चव्हाण , डॉ . प्रशांत खाडे , साईनाथ हॉस्पिटलचे डॉ . सुहास कांबळे , मेट्रो हॉस्पिटलचे डॉ . दिपक कोळगे , गांधी नर्सिंग होमचे डॉ . नितीन गांधी , ब्रम्हचैतन्य सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटलचे डॉ . महेश शिरसाळकर , सूर्या हॉस्पिटलचे डॉ . दिनकर पासलकर , मॅक्स न्यूरो हॉस्पिटलचे डॉ . उमेश फाळके , माकन हॉस्पिटलचे डॉ . किरण माकन , निरामय हॉस्पिटलचे डॉ . मिलींद जावळे , लुंकड हॉस्पिटलच्या डॉ . पल्लवी काटे , अश्विनी हॉस्पिटलच्या डॉ . स्मिता घोबले , स्टरलिंग हॉस्पिटलचे डॉ . विनायक शिंदे , लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ . सुमित काळे , डॉ . श्रीकृष्ण जोशी , देवधर हॉस्पिटलचे डॉ . एस.एस. देवधर , लाईफपॉईंट हॉस्पिटलच्या डॉ . रक्षिता इंदूरकर , डॉ . युवराज जोगदंड , डॉ . ज्योतीराज मेठी , डॉ . योगेंद्र पांडे , डॉ . सुधिर भालेराव , डॉ . सुहास माटे , डॉ . सतिश कांबळे , डॉ . सारीका झाडे , डॉ . बसवेश्वर , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते .
यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे म्हणाल्या , आमच्या महानगरपालिकेकडे कोरोना व अन्य आजारांबाबत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून आकारण्यात येणा-या दराबाबत काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या . आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे देखिल तक्रारी आलेल्या होत्या . त्यामुळे त्यांनी देखिल याबाबत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेणेबाबत सूचना केलेल्या होत्या . त्यानुसार बैठक आयोजित करण्यात आली . शासनाच्या नियमाप्रमाणे बेडस् हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवावेत , दर आकारणीसुध्दा नियमाप्रमाणे करावी , शहरातील कोरोना बाधितांची संख्या आपल्याला तुमच्या सारख्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने कमी करुन आपले शहर कोरोना मुक्त करावयाचे आहे असे त्या म्हणाल्या .
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले , कोरोना बाबतीत आठ खाजगी रुग्णालयांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे . तेथे कोव्हिड रुग्ण दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे . इतर रुग्णालयांनाही प्रशिक्षण देण्याचे काम सूर आहे . सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना लॉगीन आयडी दिलेले आहेत . त्यामध्ये कोविड नॉन कोविड माहिती भरुन सादर करावयाची आहे . शहर कोरोना मुक्त करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .