न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व करसंकलन विभागीय कार्यालयामध्ये जमा होणारा मिळकत कर भरणा बैंक ऑफ बडोदा यांच्यामार्फत प्रतिदिन जमा करण्यात येतो.
तथापि, बैंक ऑफ बडोदा यांचेमार्फत भरणा जमा करणेकामी नियुक्त करण्यात आलेला कर्मचारी कोरोना संशयीत असल्याने , करसंकलन विभागीय कार्यालयाचा भरणा जमा करता येत नसल्याबाबत बैंक मैनेजर बर्वे यांनी कळविले आहे . त्यामुळे रविवार दि. २१ / ०६ / २०२० रोजी बैंक ऑफ बडोदा यांचेमार्फत करसंकलन विभागाचा मिळकत कराचा भरणा स्विकारणेत येणार नसल्याने, दि. २१ / ०६ / २०२० रोजी रविवारी रोख स्वरूपात भरणा स्विकारात येणे शक्य नसल्याने चेक , डीडी किंवा ऑनलाईन पद्धतीने भरणा करणेबाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
सोमवार (दि.२०) पासून नियमीतपणे रोख स्वरूपात सर्वत्र भरणा स्विकारण्यात येईल, असे आवाहन महा. आयुक्त, करसंकलन विभाग यांनी केले आहे.


















