न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जून. 2020) :- कोरोना ” विषाणू COVID – 19 प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरपालिका कार्यालयांतील प्रादुर्भाव रोखण्याकरीता सन्मा.सदस्यांसमवेत एकावेळी फक्त १ नागरीक येईल, असा आदेश महापालिका आयुक्त यांनी काढला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ” कोरोना ” विषाणू COVID – 19 चा वाढता प्रादुर्भाव , रुग्णसंख्येत होत असलेली वाढ तसेच महानगरपालिका कार्यालयांमधील कर्तव्यावरील कर्मचारी / अधिकारी तसेच सन्मा.नगरसदस्य देखील ” कोरोना बाधित होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे .
उपरोक्त बाबी विचारात घेवून दिनांक ३० जून , २०२० पर्यंत महानगरपालिका अधिनस्त सर्व कार्यालयांमध्ये नागरीक , ठेकेदार व इतर यांना प्रवेश निषिध्द केलेला आहे . महानगरपालिका सेवा / कामकाजासंबंधी आपल्या सूचना , प्रस्ताव अथवा निवेदने असल्यास दुरध्वनी / भ्रमणध्वनी , ई – मेल व व्हॉट्सअपचा जास्तीत जास्त वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे.