- आज शहरातील पिंपरी व दापोडीतील दोन महिलांचा मृत्यु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 22) रोजी 94 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी (स्त्री, वय- ५२ वर्षें), दापोडी ( स्त्री, वय- ५२ वर्षें), बोपोडी (स्त्री, वय- ७० वर्षें) व मुळानगर खडकी (पुरुष, वय- ७९ वर्षें) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 1863 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 763 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण जुनी सांगवी, कामगार भवन पिंपरी, शंकरनगर, अंजठानगर, पिंपळेनिलख, पिंपरी, दत्तनगर, तापकिरनगर काळेवाडी, नढेनगर काळेवाडी, मधुबन सोसायटी जुनी सांगवी, संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी, सुदर्शन नगर चिंचवड, मोरेश्वर कॉलनी थेरगांव, सृष्टी हॉटेल पिंपळे गुरव, विशालनगर पिंपळे निलख, सिध्दार्थनगर दापोडी, काटेपुरम चौक पिंपळे गुरव, कोकणेनगर काळेवाडी, नाशिक हायवे मोशी, दिघीरोड भोसरी, बोपखेल, विशालनगर पिंपळेनिलख, किनारा हॉटेल दापोडी, मोरया पार्क पिंपळेगुरव, पिंपरी, नवभारतनगर दापोडी, संभाजीनगर चिंचवड, सोनिगरा चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, पाटीलनगर चिखली, इंदिरानगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, नानेकरचाळ पिंपरी, वल्लभनगर पिंपरी, जयभीमनगर दापोडी, मोशी, पंचतारारोड आकुर्डी, सिंधुनगर प्राधिकरण, देहूरोड, नेहरुनगर, विजयनगर काळेवाडी, महात्माफुलेनगर भोसरी, वैशालीनगर पिंपरी, संत तुकारामनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, दत्तमंदीर वाकड, थेरगांव, बोपोडी, देहूगांव, देहूरोड, मंगळवारपेठ पुणे येथील रहिवासी आहेत.
आज पीसीएमसी बिल्डिंग अजंठानगर, पीसीएमसी बिल्डिंग निगडी, आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, भिमाशंकर नगर दिघी, लिंबोरेवस्ती दापोडी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, निगडी, पारोळा जळगांव, कसबापेठ पुणे येथील रहिवासी असलेले रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा