न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची कोरोना टेस्ट मोफत करावी, असे मागणी करणारे पत्र प्रशांत शितोळे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
पत्रात असेही म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक रूग्णांना कोविड 19 ची लागन झाली आहे. आपण आपल्यापरीने निश्चितच शहरामध्ये चांगली परिस्थिती राहावी म्हणून प्रयत्न करीत आहात.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सर्व त्या सूचना व मार्गदर्शक सूचनांचे आपण पालन करत आहात. तथापि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काही निर्णय शहरातील नागरिकांसाठी आपण स्वतःहून विशेष अधिकारात घेणे व सत्ताधारी पक्षासह इतर पक्षांची त्यास मान्यता घेणे गरजेचे आहे.
आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन शहरातील नागरिकांच्या तपासणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात यावे, असे या पत्रात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे.