- प्राधिकरण कृती समितीने शहरातील पोलिस चौक्यांमध्ये केले अत्यावश्यक वस्तुंचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 30. जून. 2020) :- सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. शहरात बाधितांनी २७०० चा आकडाही ओलांडला आहे. चिंचवड, चिखली, पिंपरी या प्रमुख विभागात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कर्तव्य व सेवा बजावत असताना सर्वात जास्त धोका निर्माण होत आहे तो शहर पोलिसांना.
या करिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती समितीच्या वतीने चिंचवड पोलीस ठाणे, वाल्हेकरवाडी पोलीस चौकी तसेच देहूरोड पोलीस ठाणे येथे फूट ऑपरेटेड सॅनिटायझर हॅन्ड क्लीनर स्टँड, फेस मास्क, सॅनिटायझर बॉटल्स, १० लिटर सॅनिटायझर कॅन याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, वाल्हेकरवाडीचे पोलीस उपनिरीक्षक जी.आठवे, चिंचवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कांबळे, एल.आय.बी.चे पोलीस कर्मचारी सी.मदने,प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत,विभागीय सदस्य सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, सुरेश गावडे,उद्धव कुंभार, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, कॉम्पुटर विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी अक्षय मुनोत उपस्थित होते.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर म्हणाले,” सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अश्या वातावरणात नागरिकांनी गरज असल्यासच बाहेर पडावे अन्यथा घरीच सुरक्षित रहावे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करावे.प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे कोविड योध्ये पोलिस मित्र ,विशेष पोलीस अधिकारी हे शहर पोलीस विभागास अतिशय मोलाचे सहकार्य करीत आहेत.”
वाल्हेकरवाडी पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक श्री आठवे म्हणाले,” चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. दाट लोकवस्तीचा परिसर असल्याकारणाने येथील नागरिकांना कोविड १९ चा धोका वाढला आहे. वाल्हेकरवाडीतही आता कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. नागरीकांनी आरोग्यविषयक सतर्क राहणे आवश्यक आहे. समितीने दिलेले सॅनिटायझर सुरक्षा साधनांमुळे पोलिस कर्मचारी कोविड १९ च्या संसर्गापासून नक्कीच सुरक्षित राहतील.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहर वाढत्या कोरोना बाधितांमुळे रेड हॉटस्पॉट ठरत आहे.वाढत्या रुग्णसंख्येमुळे पोलीस कर्मचाऱयांवर अतिरिक्त कामाचा ताणही वाढत आहे.अश्यातच त्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे त्याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने शहर पोलीस विभागास सुरक्षा साधनांची मदत दिली.”
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इजिनिरिंग कॉम्पुटर विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी अक्षय मुनोत यांनी सोशल डिस्टन्स व आपण ह्या विषयी त्याचे मनोगत व्यक्त केले.












