- चिंचवडमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 30. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. 30) रोजी 120 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 38 पुरूष 82 महिलांचा समावेश आहे.
आज मृत झालेले रुग्ण अण्णासाहेब नगर चिंचवड (पुरुष, वय- ३५वर्षे), इंदिरानगर चिंचवड (पुरुष, वय- ७५ वर्षें) इंदिरानगर खडकी बाजार (स्त्री, वय- ५९ वर्षे) व मुलुंड मुंबई (पुरुष, वय- ५८ वर्षे) येथील रहिवासी आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 3029 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 1116 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 04 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण भीमनगर पिंपरी, बौध्दनगर निगडी, संजयनगर निगडी, चंद्रलोक बिल्डिंग निगडी, पिंपळे निलख, गांधीनगर खराळवाडी, निगडी प्राधिकरण, समर्थचौक वाकड, रुपीनगर, यमुनानगर, संतोषनगर थेरगांव, भोसले चाळ नेहरुनगर, चक्रपाणीरोड भोसरी, साईपार्क नेहरुनगर, दिघीरोड भोसरी, पटेलगार्डन जुनी सांगवी, मोरेवस्ती चिखली, गवळीनगर भोसरी, जवळकरनगर कासारवाडी, पेशवेनगर कासारवाडी, भारतमातानगर दिघी, महेंद्रा खराळवाडी, गंगास्काईज पिंपरी, विजयनगर काळेवाडी, संततुकारामनगर पिंपरी, महात्माफुलेनगर भोसरी, आदर्शनगर काळेवाडी, इब्राहिम मज्जीद कासारवाडी, तापकिरनगर काळेवाडी, सुदर्शननगर वाकड, सुदर्शननगर पिंपळे गुरव, टोलनाका मोशी, भंडारी पेट्रोल पंप कासारवाडी, लांडेनगर भोसरी, गुळवेवस्ती भोसरी, राजीवगांधी वसाहत नेहरुनगर, आळंदीरोड भोसरी, पवारवस्ती चिखली, शितलबाग भोसरी, जैनमंदिर भोसरी, इंद्राणीनगर भोसरी, धावडेवस्ती भोसरी, प्रेमलोकपार्क, आंबेडकर कॉलनी पिंपरी, कालभैरव सोसायटी निगडी, भाटनगर पिंपरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, मोनिका बिल्डींग पिंपरी, वाल्हेकरवाडी, शेडगेवस्ती वाकड, विनोदेनगर वाकड, भुमकरचौक थेरगांव, अशोकनगर पिंपरी, आदर्शनगर पिंपरी, केशवनगर कासारवाडी, संतज्ञानेश्वर कॉलनी काळेवाडी, चौत्रबन सोसायटी सांगवी, नटराज सोसायटी नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, हनुमान मंदिर पिंपरी, बिजलीनगर, तानाजीनगर चिंचवड, गांधीवसाहत, जोतिबानगर काळेवाडी, आळंदीरोड भोसरी, मासुळकर कॉलनी पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, शास्त्रीचौक भोसरी, आधारनगर पिंपरी, लांडेवाडी भोसरी, जयभीमनगर दापोडी, नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी, बोपखेल, संभाजीनगर, सासवड,बावधन, देहूगांव, बोपोडी येथील रहिवासी आहेत.
आज पिंपरी, रामनगर चिंचवड, अजंठानगर, बोपखेल, अंकुशचौक निगडी, विठ्ठलनगर, सिध्दार्थनगर दापोडी, शिवक्लासिक मोशी, च-होली, आकुर्डी, सुदर्शनगर चिंचवड, लिंकरोड पिंपरी, पिंपळेगुरव, भाटनगर, फिनोलेक्स कॉलनी काळेवाडी, तापकिरनगर काळेवाडी, दिघीरोड भोसरी, डिलक्समॉल, काळभोरनगर चिंचवड, काटेपुरम सांगवी, शास्त्रीचौक भोसरी, मधुबन सांगवी, मिलिंदनगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, डुडुळगांव, वैदुवस्ती पिंपळेगुरव, रामनगर रहाटणी, वरदहस्त पिंपरी, महात्माफुलेनगर भोसरी, गांधी वसाहत नेहरुनगर, नेहरुनगर, व्यंकटेशपार्क थेरगांव, नेहरुचौक दापोडी, बिजलीनगर, पंचशिलनगर,भारतमातानगर दिघी, सेक्टर चार मोशी, लिंबोरेवस्ती दापोडी, मोरवाडी, नानेकरचौक चिखली, कामगारनगर पिंपरी, कासारवाडी, नितेशनगर पिंपरी, पाटीलनगर चिखली, ग्रीन एन्मायर चिखली, भोईआळी चिंचवडगांव, संभाजीनगर भोसरी, एच.डी.एफ.सी.कॉलनी चिंचवड, क्रांतीनगर आकुर्डी, जयभीमनगर दापोडी, गुलाबनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी, पंचतारानगर आकुर्डी, अष्ठविनायक कॉलनी काळेवाडी, संभाजीनगर चिंचवड, इंदिरानगर चिंचवड, जाधवचौक दापोडी, चक्रपाणी वसाहत भोसरी, तापकिरनगर मोशी, भवानीनगर पिंपळे गुरव, गांधीनगर खराळवाडी, हनुमानगर चिखली, रमाबाईनगर पिंपरी, सोनिगरा चिंचवड, दत्तमंदिर वाकड, वल्लभनगर पिंपरी, इंद्रायणीनगर चिंचचवड, टिकळनगर थेरगांव, नखातेनगर थेरगांव, देहूरोड, रहाटणी, विश्रांतवाडी, क्रांतीनगर आळंदी, खडकी, बोपोडी येथील रहिवासी असलेले रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.