न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- शहरात अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत. त्याठिकाणी औषध फवारणी, सॅनिटाईर फवारणी केली जाते. ही फवारणी करताना संबंधित कर्मचारी भीतीच्या सावटाखाली असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेतेसाठी त्यांना पीपीई किट द्यावे, अशी मागणी फ क्षेत्रीय सदस्य दिनेश यादव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात जवळपास शंभरच्या वर कन्टेन्मेंट झोन आहेत. जेथे कोरोनाबधित रुग्ण सापडतात. त्याठिकाणी आरोग्य विभागाकडून तो भाग सॅनिटाझरची फवारणी केली जाते. तसेच कोरोना वाढू नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या सूचनांनुसार औषध फवारणी केली जाते. संबंधीत कर्मचारी फक्त तोंडाला मास्क आणि हातमोजे वापरुन ही कामे करतात. या कामगारांवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. कामा दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना पीपीइ किट द्यावे, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.