न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- कोरोना संकटात कडक लॉकडाऊन असताना काही ठेकेदार कोरोनाच्या भितीने घरात लपून बसले असताना, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी ज्या ठेकेदारांनी पोलिसांच्या लाठी-काठ्यांची पर्वा न करता तसेच, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अशा आणिबाणीच्या परिस्थितीत महापालिकेला १५ लाख मास्क पुरविले, त्या ठेकेदारांचा महापालिकेच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी महापौर माई ढोरे आणि सत्त्तारूढ पक्षनेता नामदेेेव ढाके यांच्याकडे केेेली आहेे.
पुणे शहरात आजच्या घडीला २२ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेला मास्क पुरविणा-या ठेकेदारांमुळे आपल्या शहराचा आकडा ३ हजारापर्यंत मर्यादीत आहे. ज्या काळात कापड मिळणे मुश्किल झाले होते. ट्रान्सपोर्ट बंद होते. त्यावेळी अडचणीवर मात करून या ठेकेदारांनी फक्त १० रूपयात मास्क दिले. हे मास्क महापालिकेने शहरातील झोपडपट्टा-चाळी आदी ठिकाणी वाटले. त्यामुळे शहरात कोरोना नियंत्रित राहिला. आजही मेडिकल मध्ये हाच मास्क २५ ते ३० रूपयांना मिळत आहे. त्यामुळे मास्कमध्ये भ्रष्टाचार झाला असे ओरडणारे त्या काळात मात्र घरात लपून बसले होते. त्यामुळे त्यांना ओरडण्याचा नैतिक अधिकार नाही.
महापौर माई ढोरे आणि सत्त्तारूढ पक्षनेता नामदेेेव ढाके आपण आणी-बाणीच्या काळात, संकटसमयी मास्क देणा-या या ठेकेदारांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार केला पाहिजे. यांची चौकशी लावणे चुकीचे आहे. यापुढे अशा संकटाच्या काळात कोणीही ठेकेदार पुढे येणार नाही. म्हणून हा चौकशीचा फार्स बंद करून १५ लाख मास्क देणा-या ठेकेदाराच कोरोना योध्दा पुरस्कार देवून मनपाने गौरव करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी केली आहे.