न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०३ जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०३ जुलै) रोजी २३२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील ४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
आज मोहननगर चिंचवड (स्त्री, वय- ६२ वर्षे), भीमनगर पिंपरी (स्त्री, वय- ६० वर्षे), चिंचवडेनगर (पुरुष, वय- ६५ वर्षे), रिव्हररोड पिंपरी (पुरुष, वय- ६७ वर्षे), साईनगर मामुर्डी (पुरुष, वय-६६ वर्षे), निगडी (पुरुष, वय- ८० वर्षे) व शितळानगर देहूरोड (पुरुष, वय- ५८ वर्षे) येथील सात जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३७७६ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १४८२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ०८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २२३३ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची आजही माहिती दिलेली नाही.