न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०३ जुलै. २०२०) :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात ५ सरचिटणीस असून १२ प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तर १२ सेक्रेटरी, एक कोशाध्यक्ष, ६९ कार्यकारिणी सदस्य, निमंत्रिक सदस्य १३९, विशेष निमंत्रित ५५ असे पदे असणार आहेत. बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनादेखील उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे.
त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सात जणांना संधी मिळाली आहे. माजी नगरसेविका उमा खापरे यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी, अण्णभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांची पक्ष कार्यकारिणी सचिव, माजी खासदार अमर साबळे यांची प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांची प्रदेश विधी सेलच्या सहसंयोजकपदी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांची प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे.