न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०४. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील एकाने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. शंकर कुल्हाडे असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याने पाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे.
मला सोने घालण्याची आवड आहे. एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी चांदीचा मास्क तयार केला होता. त्यातूनच मला सोन्याचा मास्क तयार करण्याची कल्पना सुचली आणि मी सोनारांकडे गेलो. मला मास्क तयार करून मिळेल का? अशी विचारणा केली. त्यांनीही संमती दर्शविल्याने मास्क तयार करून घेतला आहे. यासाठी साडेपाच तोळे सोने वापरले असून त्यासाठी २ लाख ९० हजार रुपये खर्च आला आहे, असल्याचे कुल्हाडे यांनी सांगितले आहे.