- चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी, चिखलीतील चौघांचा कोरोनाने मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०४ जुलै) रोजी १९१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील चिंचोली देहुरोड, येरवडा, औंध, आळंदी, मारुंजी, चाकण, सिंहगड रोड, हडपसर, देहुगाव, खेड, बाणेर येथील दहा पुरुष आणि आठ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.
आज पिंपरी चिंचवडमधील एम्पायर इस्टेट चिंचवड ( महिला, वय- ७८ वर्षे), सेक्टर २५ निगडी (स्त्री, वय- ६२ वर्षे), सानेवस्ती चिखली (पुरुष, वय- ४८ वर्षे), वाल्हेकरवाडी, चिंचवड (पुरुष, वय ६१ वर्षे) यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३९६७ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १५३२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ०९ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २३६९ वर पोहोचली आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण नेहरुनगर , ज्योतीबानगर काळेवाडी, जुनी सांगवी , गुळवेवस्ती भोसरी , रुपीनगर तळवडे , काचघर निगडी , शाहुनगर चिंचवड , संत तुकाराम नगर पिंपरी , वैदुवस्ती पिंपळे गुरव , साईचौक पिंपरी , गुरुदेवनगर आकुर्डी , बंजरंगनगर खराळवाडी , प्राधिकरण निगडी , पवारनगर सांगवी , कासारवाडी , कामागार नगर पिंपरी , गायकवाडनगर दिघी , इंदिरानगर निगडी , पाटीलनगर चिखली , गव्हाणेवस्ती भोसरी , घरकुल चिखली , कुदळे चाळ पिंपरी , साईकॉलनी रोड रहाटणी , मोरवाडी पिंपरी , पिंपळे सौदागर , गणेशनगर भोसरी , शास्त्री कॉलनी पिं.सौदागर , गांधीनगर पिंपरी , केशवनगर कासारवाडी , एच.ए कॉलनी , आदिनाथनगर भोसरी , गांगुर्डेनगर पिं . गुरव , आदर्शनगर काळेवाडी , इंदिरानगर चिंचवड , लांडेवाडी , जयभिम नगर दापोडी , बोपखेल , खंडोबामाळ भोसरी , आळंदीरोड भोसरी , लिंकरोड पिंपरी , विद्यानगर चिंचवड , पंचतारानगर आकुर्डी , एम्पायर इस्टेट चिंचवड , लक्ष्मीनगर पिं.गुरव , अष्टविनायक चौक आकुर्डी , च – होली , पवनानगर काळेवाडी , देहु – आळंदी रोड चिखली , क्षितीज नगर चिंचवड , साईबाबानगर चिंचवड , शिवधन रेसिडन्सी आकुर्डी , ताम्हाणेवस्ती चिखली , सुदर्शनगर पिं . गुरव , शिवानंद पिंपरी , काळभोरचाळ निगडी , पवनेश्वर मंदिर पिंपरी , मिलींदनगर पिंपरी , शिवनेरी बिल्डींग पिं . गुरव , बौध्दनगर पिंपरी , राजवाडेनगर काळेवाडी , रमाबाईनगर पिंपरी , भाटनगर , संभाजीनगर चक्रपाणी वसाहत भोसरी विठ्ठलनगर नेहरुनगर , चक्रपाणी वसाहत भोसरी , दत्तनगर चिंचवड , विठ्ठलवाडी आकुर्डी , आंबेडकरनगर पिंपरी , शरदनगर पिंपरी , शिवाजीवाड़ी भोसरी , विजयनगर पिंपरी , नढेनगर काळेवाडी , गजानननगर पिं.गुरव , म्हलारी बिल्डींग भोसरी , धावडेवस्ती भोसरी , यमुनानगर निगडी , दत्तनगर चिंचवड , इंद्रायणीनगर भोसरी , यशवंतनगर पिंपरी , उदयनगर पिंपरी , फुलेनगर भोसरी , पदमावती नगरी चिखली , लांडगेआळी भोसरी , बनगरवस्ती मोशी , मोहननगर चिंचवड , जाधववाडी भोसरी , गणेश साम्राज्य मोशी , ढोरेनगर सांगवी , काळभोर नगर चिंचवड , शिवरत्न कॉलनी काळेवाडी , म्हाळसाकांत चौक आकुर्डी , विकासनगर किवळे , कोकणेनगर काळेवाडी , एकता सोसायटी मोशी , विन्डसर पार्क वाकड , तुळजाई वस्ती आकुर्डी , प्रियदर्शनीनगर जुनी सांगवी , श्रीनगर काळेवाडी येथील रहिवासी आहेत.
आज ताम्हाणेवस्ती चिखली, आनंदनगर चिंचवड , लांडेवाडी भोसरी , विठ्ठलनगर पिंपरी , कैलासनगर थेरगाव , चक्रपाणी वसाहत भोसरी , महेशनगर पिंपरी , पवारनगर सांगवी , मोरवाडी , इंदिरानगर चिंचवड , गांधी बसाहत , सिध्दार्थ नगर दापोडी , बोपखेल , शास्त्री चौक भोसरी , बौध्दनगर ओटास्किम , राजीवगांधी वसाहत नेहरुनगर , कुलदीप आंगण नेहरुनगर , वैशालीनगर पिंपरी , गंधर्वपार्क चिंचवड , दिधीरोड भोसरी , डिमार्टजवळ रावेत , आदर्शनगर दिघी , साईबाबानगर चिंचवड , मासुळकर कॉलनी पिंपरी , काळभोरनगर चिंचवड , यमुनानगर , केशवनगर चिंचवड , दत्तनगर , शिवतीर्थ कॉलनी काळेवाडी , ज्योतिबानगर काळेवाडी , साई कृष्णपार्क थेरगाव , पिंपरी कॉलनी , गणेशनगर थेरगाव , दळवीनगर , गवळीमाथा भोसरी , जाधववाडी चिखली , च – होली , सुदर्शननगर पिंपळे गुरव , संत तुकारामनगर भोसरी , सिध्दार्थ कॉम्प्लेक्स काळेवाडी , रिव्हर रोड पिंपरी , शाहुनगर चिंचवड , मोरेवास्ती चिखली , सृष्टी चौक पिं . गुरव , नखातेनगर थेरगाव , केसर ट्री टाऊन मोशी , सोनवणे वस्ती चिखली , आळंदी रोड चिखली , जैन मंदीर भोसरी , काटेचाळ दापोडी , लक्ष्मी नगर पिंपळे गुरव , कासारवाडी , मुंजोबारोड मंदीर वाकड , अशोक नगर पिंपरी , आंबेडकर कॉलनी पिंपरी , गुरुदेव नगर आकुर्डी , भाटनगर , बौध्दनगर , बाणेर , येरवडा , दौंड , आंळदी , बोपोडी , नवी पेठ , धानोरी , दत्तवाडी पुणे येथील रहिवासी असलेले कोविड -१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.