न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जुलै. २०२०) :- पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
ट्वीट करुन महापौर मोहोळ यांनी सांगितले की, “थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”