न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जुलै. २०२०) :- लोणावळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले असून पायऱ्यांवरून पाणी वाहात आहे. लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. दरवर्षी पर्यटक भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पाहात असतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर इथं वर्षाविहार करण्यास पर्यटकांना सक्त मनाई आहे.
जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश झुगारुन जर कोणी वर्षाविहारासाठी भुशी डॅमवर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.