- साने कुटुंबीयांचे केले सांत्वन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी (दि. ७) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते कै. दत्ता काका साने यांच्या चिखली, साने चौकातील निवासस्थानी भेट घेऊन साने कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. साने हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. अनेकदा त्यांना दुसऱ्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे व आदी उपस्थित होते.
दत्ता साने यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधीत त्यांनी आक्रमकतेने सत्ताधारी पक्षाला जेरीस आणले होते.
त्यांच्या जाण्याने शहर राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी दत्ता साने यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यामुळे दत्ता साने यांचे पक्षातील महत्व अधोरेखित होत आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत असलेल्या करोना बाधित रुग्णांमुळे शहरातील किमान सात दिवस लॉकडाऊन वाढवून कडक करण्यात यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.












