न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- लायन्स क्लब ऑफ पुणे फिल गुडच्या अध्यक्षपदी ॲड.विठृल गंगाराम सोनार यांची, तर सचिवपदी प्रभाकर चेडे आणि खजिनदारपदी संतोष कोळपे यांची २०२०-२०२१ या वर्षासाठी निवड करण्यात आली.
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्टी्क्ट ३२३४ डी २ चे प्रातपाल अभय शार-र्त्री यांनी लायनिझम वर्षे २०२०-२०२१ चा कार्यभार स्विकाराला. लायन्स क्लब इंटरनॅशनल ही स्वयंसेवी संस्था जगभरात २०९ देशात कार्यरत आहे. या संस्थॆचे १५ लाख सदस्य आहेत.व्हिजन, हंगर, डायबेटीस, परर्यावरण आणि चाइल्डहुड कॅन्सर अवेअरनेस हे पाच उद्वॆश ठेवुन ही संस्था सर्व क्लबच्या माध्यमातुन सेवाकार्य करत आहे.












