न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- शहरातील आठ खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांकडून भरमसाट बिले वसूल केली जात आहेत. तसेच, बेड उपलब्ध असूनही नसल्याचे सांगितले जात आहे. यासाठी महापालिकेने हॉस्पिटल बेड मॅनेजमेंट UG सिस्टिम (एचबीएमएस) सेलची स्थापना केली आहे. त्यामुळे खासगी तसेच पालिका रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, हे नागरिकांना समजणार आहे.
तसेच पालिकेचे अनेक रुग्णालये व कोविड केअर सेंटर आहेत. या कक्षावर नागरिकांना दररोज माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती पालिकेच्या संकेतस्थळ व सारथी हेल्पलाईनवर उपलब्ध असणार आहे. या कक्षाची जबाबदारी कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.


















