- शहरात दोन टप्प्यात सोमवारपासून १० दिवस लॉकडाऊन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२०) पिंपरी चिंचवड आणि पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा आदेश काढला आहे. त्यानुसार १३ जुलै ते २३ जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना काही वस्तूची खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असल्याचं आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं.


















